पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या संकटात संत तुकारामनगर प्रभागातील नागरिकांच्या पाठीशी माजी महापौर योगेश बहल खंबीरपणे उभे राहिले आहेत. योगेश बहल मित्र परिवाराच्या वतीने प्रभागातील गरजूंना अन्नधान्य वाटप तसेच नागरिकांना हेल्थकिटसह ‘आर्सेनिक अल्बम 30’ गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या संकटात सापडले आहे. ह्या संकटात सर्वात जास्त हाल हातावर पोट आहे अशा घटकांचे झाले. रोजगार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा वेळी कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरजु नागरिकांना माजी महापौर योगेश बहल व मित्र परिवार यांच्या वतीने सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून प्रभागात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सुमारे ४ हजार घरांमध्ये अन्नधान्य पॅकेटचे वाटप करण्यात आले. तसेच १५ हजार घरांमध्ये हेल्थकिट (१ सॅनिटायजर बॉटल, ५ मास्क, १ डेटॉल साबण, व्हिटॅमिन C संत्री) असे हेल्थ किटचे वाटप करण्यात आले. तसेच संपूर्ण प्रभागामध्ये घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली.
तसेच नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम 30’ हे होमिओपॅथीक औषध संपूर्ण प्रभागात आत्तापर्यंत ११ हजार औषधांच्या गोळ्या घरपोच वाटण्यात आल्या. कोरोनाच्या संकटात योगेश बहल हे लोकांच्या सेवेत नेहमीच तत्पर राहिले आहेत. नागरिकांच्या अडीअडचणी मध्ये मदत करत आहेत. त्यांनी लोकांना आवाहन देखील केले आहे की ज्यांना कोणाला कोणतीही अडचण समस्या असेल त्यांना मदत केली जाईल असे आवाहन केले आहे.























Join Our Whatsapp Group