नवी दिल्ली (Pclive7.com):- देशात लॉकडाऊन 4.0 लॉकडाऊन उद्या दि.31 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5.0 साठी नवीन गाईडलाईन जाहीर केली आहे. शनिवारी कोरोना व्हायसरचे सुमारे 7900 रूग्ण आढळले होते तर एकुण संक्रमितांची संख्या 1.69 लाख पर्यंत पोहचली होती. आतापर्यंत 4900 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. दरम्यान उपचारानंतर बर्या होणार्या बाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ झाली असून ती 81 हजारांवार पोहचली आहे. दरम्यान, सरकारनं लॉकडाऊन 5.0 हा 30 जून पर्यंत असेल असं जाहीर करून नवीन गाईडलाईन जाहीर केली आहे.
शाळा आणि कॉलेज उघडण्यासंदर्भातील निर्णय केंद्र सरकारनं राज्य सरकारांवर सोडला आहे. जुलैमध्ये राज्य त्यावर निर्णय घेतली. हॉटेल, धार्मिक स्थळ, रेस्टॉरंट 8 जून पासून उघडतील. दरम्यान, सरकारनं काही नियम आणि अटींवर त्यांना उघडण्याची परवानगी दिली आहे. देशात रात्री 9 ते पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान कर्फ्यू लागू राहणार आहे. नागरिक एका राज्यातून दुसर्या राज्यात जावू शकतील. आता त्यांना पास दाखवण्याची देखील गरज नाही.
– ३० जून २०२० पर्यंत कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहणार आहे.
– कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन अधिक कठोर करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल.
पहिल्या टप्प्यात काय उघडणार
– आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
– हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
– शॉपिंग मॉल उघडणार.
दुसऱ्या टप्प्यात काय उघडणार
– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील.
तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार
सर्व परिस्थितीचे आकलन करुन या गोष्टी कधी सुरु करायच्या त्या संदर्भात निर्णय घेण्यात येतील.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
– सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
– क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.























Join Our Whatsapp Group