पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील युवा आणि युवती सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ५१ जणांनी रक्तदान केले. थेरगावातील दत्त मंदिर येथे गुरुवारी (दि.४) रक्तदान शिबिर पार पडले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, विश्वजित बारणे, युवासेना अधिकारी राहुल पालांडे, रुपेश कदम, प्रताप बारणे, अनिता तुतारे, शर्वरी जळमकर आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरे होत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ५१ जणांनी रक्तदान केले.























Join Our Whatsapp Group