पिंपरी (Pclive7.com):- मोशीचे सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना नेते परशुराम आल्हाट व त्यांच्या पत्नी रुपाली आल्हाट हे समाजसेवा सातत्याने करत आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा कोरोनाचा शिरकाव आपल्या परिसरात झाला तेव्हापासून हे दाम्पत्य सतत जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आलेलं आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता औषध फवारणी असेल, रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्या असतील, सॅनिटाईझर फवारणी असेल अश्या माध्यमातून जनतेपर्यंत थेट संपर्कात आहेत.
मात्र, कोरोनाशी लढता…लढता… आल्हाट दांम्पत्य स्वत: कोरोनाबाधित झाले. दोघे ही कोरोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी परशुराम आल्हाट यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला व ते म्हणाले भाऊ, आमच्या वडिलांची प्रकृती गंभीर झालीये ते ‘लाईफलाईन’ या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून तातडीने ‘ओ’ पॉझिटिव्ह प्लास्मा पाहिजे, खूप लोकांना संपर्क केला असता कोणीही पुढे यायला तयार नाही. परशुराम यांनी क्षणाचाही विचार नकरता त्यांच्या बंधूना संपर्क केला व घटनेची माहिती दिली. त्यांच्या बंधूने प्लाझ्मा दान करणारे दाता यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेऊन प्लाझ्मा उपलब्ध केला. त्यानंतर स्वतः PPE किट घालून त्या रुग्णाजवळ जाऊन त्या रुग्णाची विचारपुस केली व तुम्हाला कशाचीही गरज भासल्यास तात्काळ आम्हाला संपर्क करा असा शब्द ही दिला.
कोरोना काळात सर्वसामान्य लोकांसाठी धडपणारे आल्हाट दाम्पत्य स्वत: कोरोनाबाधित झाले. मात्र, त्यांनी सामाजिक कार्य थांबवले नाही. त्यांच्या कार्याचे मोशी आणि परिसरात कौतुक होत आहे.






















Join Our Whatsapp Group