पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वधर्मीय मंदीरे, प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली होती. मात्र राज्यात आता अनलॉक सुरू झाले आहे. तरी देखील राज्यातील सर्व धार्मिक अद्यापही बंद आहेत. त्याच्या निषेधार्थ आज (दि.०९) पिंपरी चिंचवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने आकुर्डी येथील खंडोबा मंदिराच्या प्रवेशव्दारासमोर आंदोलन करण्यात आले.
आरपीआयचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी रिपाई महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, अल्पसंख्याक पिंपरी चिंचवड अध्यक्ष शेखलाल नदाफ, युवा नेते कुणाल वाव्हळकर, दुर्गप्पा देवकर, हरी नाय्यर, विनोद लाडी, शुभम शिंदे, दिनकर म्हस्के, सुजित कांबळे, विशाल कदम, शंकर इंगळे, बापू गायकवाड, छोटू शिंदे अक्षय दुनघाव, मयूर जाधव, मनोज जगताप आदी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व धर्मिय प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. आता मात्र अनलॉक सुरू झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेत प्रबोधन झाले असल्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन सुरक्षेचे नियम पाळून मंदिर, मस्जिद, चर्च, बुद्धविहार, गुरुद्वारा देरासार अशी सर्वधर्मिय प्रार्थनास्थळे सुरू करावीत. यासाठी आज हे आंदोलन घेण्यात आले.























Join Our Whatsapp Group