पिंपरी (Pclive7.com):- भारताचे पंतप्रधान मा नरेंद्रभाई मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या सांगवी – काळेवाडी मंडलच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना चष्मे, मास्क तसेच हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन मंडलचे अध्यक्ष विनोद तापकीर यांनी केले होते.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात व राजू दुर्गे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक २२ व २७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना चष्मे, मास्क तसेच हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले.
यावेळी सांगवी – काळेवाडी मंडलचे अध्यक्ष विनोद तापकीर, नगरसेवक बाबासाहेब त्रिभवुन, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणक, सुरेश पाटील, संभाजी नढे नरेश खुळे, अतुल नढे, भरत टाकुर, आकाश भारती, अतिश कांबळे, सुनीताताई खराडे, अतुल पवार, व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आरोग्य निरीक्षक सर्व सफाई कामगार उपस्थित होते.



















Join Our Whatsapp Group