पिंपरी (Pclive7.com):- सोलापूर जिल्हातील माळशिरस तालुक्यातील मळोली या गावी ढगफूटी झाल्यांने पूरपरस्थिती निर्माण झाले व गावांतील अनेक घरे त्या पूरपरस्थितीने वाहून गेले.
मातोश्री सामाजिक संस्थेने त्या गावातील परस्थितीचा आढावा घेवून त्या ठिकाणी २० सप्टेंबर रोजी मातोश्री सामाजिक संस्थेचे खजिनदार नवनाथ जाधव तसेच मोहित जाधव यांच्या पुढाकारांने संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर, कार्याध्यक्ष गोरख पाटील, सचिव रविकिरण घटकार, यांनी त्या गावातील पूरग्रस्त नागरीकांना संसारपयोगी भांडयाचा संपूर्ण सेट व अन्नधान्य ब्लॅकेट सतरंजी खाऊचे पाकिट वाटप केले.
यावेळी पंचायत समितीसदस्य रणजित (बापू) जाधव, सरपंच गणेश पाटील, तसेच ग्रामस्थ व गांवातील ग्रामपंचायतीतील सदस्य लोकप्रतिनिधी हे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group