पिंपरी (Pclive7.com):- अतिवृष्टीमुळे मोशी येथील कचरा डेपोमध्ये मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन महानगरपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळला असल्याची माहिती समोर येत आहे.

या दुर्घटनेत दोन ते तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, आठ ते दहा कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच अन्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके अथक प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, प्रशासनाकडून अधिकृत माहितीची समोर आली नसून मृतांची व जखमींची नेमकी संख्या बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
(बातमी अपडेट होत आहे.)





















Join Our Whatsapp Group