चिखली (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चिखली घरकुल परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने संतप्त नागरिकांनी भक्ती-शक्ती चौक ते खडी मशीन चौक या स्पाईन रोडवर रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

दोन दिवसांपासून साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे घरकुल परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून ये-जा करणेही कठीण झाले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

याआंदोलनामुळे स्पाईन रोडवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नागरिकांनी तातडीने पाणी निचऱ्याची व्यवस्था करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.





















Join Our Whatsapp Group