पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी फुल बाजार आडत संघ सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात ग्राहक असल्यांने आपल्या गाळ्याचे पूजा फूलांचे व्यापारी घबाडषष्ठी या शूभ मूहूर्तावर दरवर्षी साजरी करत असतात. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही तोच उत्साह व्यापाऱ्यांमध्ये दिसून आला.
या दिवशी दुकानातील वजनकाटा वह्या हिशोबाचे पूस्तकांचे सर्व साहित्य व कामगारांचा तसेच शेतकर्यांचा हिशोब आजच्या दिवशी पूर्ण केला जातो व बोनस तसेच सत्यनारायण महापूजा व नेहमीचे ग्राहकांना मिठाई वाटप करून करण्यात आले.
यावेळी उपस्थित मातोश्री सप्तश्रृंगी पुष्प भांडार गाळ्याचे मालक गणेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभागप्रमूख राजू शिंदे, फूल बाजाराचे अध्यक्ष राजकूमार मोरे, उपाध्यक्ष दत्ताञय फूले, शिवाजी सस्ते, संजय बोडके, संतोष जाधव, रमेश चव्हाण, बाबा रासकर, मिनाताई आहेर, सूनील काळे, दत्ताञय ठक्कर, राक्षे मामा, अजय हांडबर, बाळू वाघूले, विश्वास तापकिर, आनंता फूले, अजित तापकिर, संतोष कदम, शाम मांडगे, किरण जाधव, नितीन रासकर तसेच शहरातील सर्व फूल विक्रेते उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group