पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक संघटक मंगेश शिवाजी असवले यांनी एक उपक्रम राबविला आहे. दिघी परिसरातील गरजू नागरिकांसाठी त्यांनी पुढाकार घेतला असून ४०० मास्क आणि सॅनिटायझर डॉक्टरांकडे सुपूर्द केले आहेत.
कोरोनाच्या या संकट काळात मंगेश असवले यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मास्क, आणि सॅनिटायझरचा वापर प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. आर्थिक अडचणीमुळे गोरगरिब मास्क आणि सॅनिटायझर घेणे टाळतात. म्हणूनच अशा गरजूंना देण्यासाठी ४०० मास्क आणि सॅनटायझर मंगेश असवले यांनी डॉक्टरांकडे दिले आहेत.
दरम्यान मंगेश असवले यांनी परिसरातील डॉक्टरांची भेट घेऊन त्यांचा ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मान केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे सरचिटणीस असिफ शेख, अमोल देवकर आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group