पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त जयंत पाटील हे मावळ तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पिंपरीगाव येथील संजोग वाघेरे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे युवानेते पार्थ पवार, मावळचे आमदार सुनिल शेळके, माजी आमदार विलास लांडे, संजय वाबळे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, स्थायी समितीच्या माजी सभापती, विद्यमान नगरसेविका सौ.उषाताई संजोग वाघेरे तसेच युवानेते ऋषिकेश वाघेरे पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.























Join Our Whatsapp Group