पिंपरी (Pclive7.com):- मराठा उद्योजक लॉबी आयोजित राज्यव्यापी महारक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुकास्तरावर एकूण २७ ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये हजारो बांधवांनी रक्तदान केले.
मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक विनोद बढे, कार्याध्यक्ष स्वप्नील काळे व कोअर कमिटीच्या निर्णयानुसार पुणे ॲडमीन केडी उर्फ कुलदीप पाटीलसर यांनी जिल्ह्यात २ ठिकाणी पुणे शहरामध्ये हडपसरला व ग्रामीणमध्ये मंचर, आंबेगाव येथे रक्तदान शिबीराचे नियोजन करण्यात आले होते.
पुणे शहर व जिल्हा येथे अवघ्या दोनच दिवसाच्या तयारीनंतर ७८ हून अधिक बॅग रक्त संकलित करण्यात आले.
या नियोजनात प्रामुख्याने चिंतेश्वर देवरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख उदय भक्ते व वैभव फरतडे, MUL पुणे टीम (शहर व ग्रामीण), MUL मिडीया, कॅल्सी उद्योगसमूहाच्या कल्याणीताई, नोबेल हॉस्पिटलचे वाळूंजसर, मंचर मधील विनोदभाऊ तसेच सिटी हॉस्पिटल, मंचर. कॅल्सी उद्योगसमूह, पुणे AR Labdor, पुणे, MUL आंबेगाव टीम, पुणे ब्लड बँक टीम यातील सर्व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले आहे.






















Join Our Whatsapp Group