पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीची शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे. मिशन २०२२ अंतर्गत प्रभागनिहाय बैठका सुरु असून विधानसभा निहाय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (दि.३०) आकुर्डी आणि थेरगाव येथे मेळावा होणार आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मेळावा शनिवारी दुपारी ३ वाजता आकुर्डीतील मल्हारराव कुटे सभागृहात होणार आहे. तर, चिंचवड विधानसभा क्षेत्रातील मेळावा सांयकाळी ५ वाजता थेरगाव, वाकड रोड येथील शिव कॉलनीतील सभागृहात होणार आहे.
शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे हे मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. युवासेना संपर्कप्रमुख राजेश पळसकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, विधानसभा संघटिका सरीता साने, अनिता तुतारे, युवासेनेचे जितेंद्र ननावरे, विश्वजीत बारणे, अभिजित गोफण, शर्वरी जळमकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.






















Join Our Whatsapp Group