पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती कोण होणार याचा फैसला आज (दि.०२) होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज दुपारी ३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणुक शुक्रवारी (दि.०५) दुपारी १२ वाजता होणार आहे.
स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाली आहे. नगरसचिव उल्हास जगताप यांनी दुपारी ३ वाजता कार्यालयाच्या बाहेर येऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.
भाजपकडून सभापती पदासाठी रवी लांडगे, नितीन लांडगे, शत्रुघ्न काटे यांच्यात चुरस आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप हे दोघेही सध्या मुंबईत असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सभापती पदी कोणाची वर्णी लागणार याचा निर्णय थोड्यावेळात होणार असून महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांना नाव कळविले जाणार आहे.





















Join Our Whatsapp Group