पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. आज (दि.२५) रोजी शहरात १८११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ७२२ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरात धुलीवंदन आणि रंगपंचमी उत्सव साजरा न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाईचे देखील आदेश दिलेत.
■ पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स
सौजन्य – Pclive7.com
(पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज)
● गुरूवार दि.२५ मार्च २०२१
📲 अपडेट्स सायं ४.०० वाजेपर्यंतचे 📲
▪आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = १८११
▪आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह = १२८७४७
▪आज Pcmc बाहेरिल पॉझिटिव्ह रुग्ण = ०७
▪सध्या Pcmc मधील कोरोना रूग्ण = १४०३५(रूग्णालय २२३५ + होम क्वारंटाईन ११८००)
▪एकूण मृत संख्या = २७७१ (आज मृत = १५)(Pcmc १९५० + ८२१ शहराबाहेरील)
▪एकूण कोरोनामुक्त रूग्ण = ११२७६२(आज ७२२ रूग्ण डिस्चार्ज)
▪आज दाखल संशयित रूग्ण = ४१२४
▪आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण = १७३०
▪प्रतिक्षेतील अहवाल = १९४९
▪होम क्वारंटाईन = ५०३(एकूण = १५३५२६)
▪दैनंदिन सर्व्हेक्षण = ४०८५
● पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २३१, ब – ३४६, क – १४६, ड – २९८, इ – १७४, फ – २०१, ग – २७४, ह – १४१ = एकुण – १८११
■ पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष – संत तुकाराम नगर (७२ वर्षे), फुगेवाडी (५९ वर्षे), पिंपरी (७८ वर्षे), चिंचवड (७८ वर्षे), सांगवी (६४ वर्षे) ०२ स्त्री – पिंपरी (६५ वर्षे), दिघी (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
■ पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – जुन्नर (६५ वर्षे), पाबळ (७६ वर्षे), खडकी (५३ वर्षे), पुणे (७२ वर्षे), ०२ स्त्री – चाकण (५७ वर्षे), पुणे (५६ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
● टिप :- आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०६ मृत्यु झालेले आहेत.
😷 STAY HOME 🏚️ STAY SAFE 😷
🏥 Source – PCMC Health Dept. 🏥





















Join Our Whatsapp Group