पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा आता २००० पार झाला असून आज नवीन कोरोना रुग्णांची संख्या २२७५ इतकी झाली आहे. आज कोरोना मुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बारा महानगरपालिका हद्दीमधील आहे. तर १ महानगरपालिका हद्दीबाहेरील आहे.
आज पर्यंत सकारात्मक कोरोना रुग्णांची संख्या एक लाख ३४ हजार ५४१ अशी झाली असून आज पर्यंत १९७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज १२८६ जण कोरोना मुक्त झाले. आज पर्यंत १ लाख १६१७७ जण कोरोना मुक्त झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना कहर व उद्रेक चा पाहता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत आज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत जमाव बंदीचे आदेश दिले आहेत नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे मास्क चा वापर करावा असे आवाहन वारंवार केले जात आहे.






















Join Our Whatsapp Group