पिंपरी (Pclive7.com):- आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी रांचीमध्ये कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तो कुटुंबीयांसोबत वेळ घालवतानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. दरम्यान, धोनीने पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिसरात नवे घर घेतल्याची माहिती समोर आली आहे. या फ्लॅटवर धोनी अनेकदा आल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे.
यष्टीरक्षक आणि स्फोटक फलंदाज म्हणून महेंद्रसिंह धोनीने आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात केली. करोडो भारतीयांची मने त्याने काही कालावधीतच जिंकली. दरम्यान, विश्वचषक जिंकून प्रत्येक भारतीयांच्या मनावर धोनीने राज्य केलं. त्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
आयपीएलचे सामने खेळण्याच्या निमित्ताने धोनी पुण्यात यायचा. याच काळात महेंद्रसिंह धोनीने गहूंजे क्रिकेट स्टेडियम जवळच असणाऱ्या किवळे परिसरात फ्लॅट घेतला. तेव्हा पासून धोनी तीन ते चार वेळेस या फ्लॅटवर राहण्यास देखील आल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, तो तेथील फ्लॅटवर येऊन बराच कालावधी उलटून गेला आहे.






















Join Our Whatsapp Group