पिंपरी (Pclive7.com):- युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी युवासेनेकडून कासारवाडीतील सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले.
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आदित्य जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अविरत सेवा करणाऱ्या कासारवाडी येथील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोझचे वाटप करण्यात आले. यावेळेस समाजसेविका शिलामामी जाधव, आरोग्य अधिकारी धनश्री जगदाळे, रवी नगरकर, संजय पिंपळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group