पिंपरी (Pclive7.com):- मंथन फाउंडेशन व प्रोजेक्ट ॲक्सेलरेट वाय.जी. केअर शून्य ते १७ वयोगटातील मुलांच्या विकासासाठी त्यांच्या आरोग्यासाठी काम करते. मंथन फाउंडेशनतर्फे मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी च्यवनप्राशचे वाटप भोसरी येथे करण्यात आले.
संस्था एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांसाठी पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागात काम करत आहेत. सध्या कोरोनाची येणारी तिसरी लाट ही मुलांना त्रास देऊ शकते व पावसाळ्यात आपली प्रतिकार क्षमता कमी होत असते. त्या अनुषंगाने वाटप केले आहे. च्यवनप्राश मुळे श्वसन मार्ग स्वच्छ राहते, पाचन सुधारते, रक्त शुद्ध होते, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब नियंत्रित राहते व ऊर्जा मिळते. याच बरोबर योगाचे प्रशिक्षण मंथन फाउंडेशन तर्फे दिले जाते.
मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट, ऐश्वर्या खोत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सहकार्य डॉ. रोहन सुमन, दीपक निकम वाय.आर.जी केअर, अंजली नाटेकर, निखिल डोंगरे, संदीप एडकेवार, रेखा डाळिंबे, सुरेखा, मुग्धा आठल्ये यांचे लाभले.





















Join Our Whatsapp Group