
पिंपरी (Pclive7.com):- संघटन सृजन अभियान अंतर्गत नव्याने महाराष्ट्रात नेमलेल्या 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या दहा दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच ग्रेप रिसॉर्ट, गंगापूर, नाशिक येथे संपन्न झाला. दि. 24 ऑगस्ट 2026 ते 02 सप्टेंबर 2026 या 10 दिवशीय जिल्हाध्यक्षांच्या निवासी शिबिरामध्ये राजकारण, काँग्रेस विचारधारा, सर्वोदय मार्ग, तळागाळातील संपर्क कृती आराखडा, जातिव्यवस्था आणि आरक्षण, थेट गाव भेट राहता माहिती दौरा, काँग्रेसचा इतिहास, सांस्कृतिक राजकारण, भाषेचे राजकारण, लिंग भाव, आर्थिक प्रश्न, शहरी राजकारण, प्रशिक्षण प्रभाव, संघटन बांधणी, फेसिझम बहुसंख्यांकवाद, धर्मनिरपेक्षता, विकसित भारत वास्तव, नवनिर्माण कृती आराखडा, प्रत्यक्ष खड्डे खोदून जलसंवर्धन उपक्रम, या सर्व विषया बाबतीमध्ये तज्ञांचे मार्गदर्शन दिशादर्शक कार्यक्रम आणि सखोल माहिती देण्यात आली.

प्रत्यक्ष गाव भेट दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आल्याचे जिल्हाध्यक्षांनी एकत्रित संवादामध्ये सादरीकरण केले, प्रत्यक्ष थेट खड्डे खोदण्याच्या मनरेगा योजना प्रत्यक्ष कृतीतून दर्शवण्यात आली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये सचिन राव, खासदार एस् सेंथिल, उल्हास पवार, उल्का महाजन, दीपक पवार, दीपा पवार, डॉ.नीरज हत्तेकर, वामशी रेड्डी, समीर शेख, लोकेश शेवडे, विश्वजीत कदम, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, के राजू, विजय इंदर सिंगला, विजय वडेट्टीवार, के कन्नन आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण शिबिराच्या शेवटच्या दिवशी राहुलजी गांधी सर्व जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांसमवेत स्नेहभेट घेतली नंतर त्यांनी जागतिक राजकारण आणि भारत या विषयावर स्वतः दोन तास संवाद शिबिरार्थींशी संवाद साधला, स्व – सुदृढता मानसिक स्थैर्य, लक्ष, ध्यान यांचा परस्पर संबंध दर्शवत मार्गदर्शन केले. एकंदरीतच नवनिर्माणातून परिवर्तन असा संदेश देत शिबिर संपन्न झाले.

पिंपरी-चिंचवड शहरातून काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे हे दहा दिवस या शिबिरात सहभागी झाले आणि शिबिराच्या शेवटच्या दिवशी कुटुंबीयासह त्यांनी राहुल गांधी यांची भेटही घेतली.
याबाबत सांगताना बनसोडे म्हणाले, नवा संकल्प, “नवी दिशा- दृष्टी, नवे मार्ग, कृती कार्यक्रम, प्रशिक्षणातून कृतीकडे नेणारे हे शिबिर अत्यंत यशस्वी झाले आणि निश्चित त्याचा परिणाम येणाऱ्या काळात सर्व जिल्ह्यांमधून संघटना बांधणी, निवडणूक तयारी आणि जन्म माणसांचे प्रश्न सोडविने या त्रिसूत्रीतून दिसून येईल, काँग्रेसची ध्येय-धोरणे व विचारधारा, कार्यकर्त्याची विचार आचार व व्यवहार संस्कृती, जनतेशी संवादाची पद्धत, पक्षाची संघटनात्मक कार्यपद्धती, बूथ ते शहर पातळीवरील कृती आराखडा, पुढील 3/6 महिन्यांचे लक्ष्य निश्चिती, कार्यकर्त्यांचे अनुभव व सूचना हे सर्व शिकावयास मिळाले” असे बनसोडे यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group