पिंपरी (Pclive7.com):- वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आळंदी आणि देहू रस्त्यावर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या प्रवेशद्वारावर स्वागत उभारण्यात येणार आहे. कमान या कामाअंतर्गत देहू येथे महापालिका हद्दीवर कमान उभारण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना निविदा स्वीकृत रकमेच्या १.९५ टक्के शुल्क देण्यात येणार आहे.
महापालिका हद्दीलगत पूर्वेस आळंदी आणि पश्चिमेस देहूगाव अशी दोन तीर्थक्षेत्रे आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी, भाविक आळंदी आणि देहू येथे येत असतात. सद्यस्थितीत देहू-आळंदी हा मार्ग बीआरटीएस विभागामार्फत विकसित केला आहे. याच ३० मीटर रुंदीच्या मार्गावरून भाविक आळंदी ते देहू असा पायी प्रवास करतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही या तीर्थक्षेत्रास भेट देण्यासाठी वारकरी येत असतात. त्यांचा या मार्गावरील बहुतेक सर्वच प्रवास पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून होत असतो. मार्गावर महापालिकेमार्फेत स्वाग कमान अथवा प्रवेशद्वार उभारले नव्हते. या रस्त्यावर महापालिका हद्दीत देहूकडून येताना तळवडे परिसराच्या सुरुवातीस स्वागत कमान उभारण्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
देहू-आळंदी रस्त्यावर देहू येथे महापालिका हद्दीवर कमान उभारण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी दर मागविण्यात आले होते. त्यानुसार, किमया यांचा १.९५ टक्के इतका लघुत्तम दर प्राप्त झाला आहे. कामाचे नियोजन करून आराखडे तयार करणे, सुशोभीकरणाच्या बाबींचे दरपृथ्थकरण करणे, निविदापूर्व आणि निर्विदापश्चात कामे करावी लागणार आहेत.