मुंबई (Pclive7.com):- मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज पाटील याने सुसाईट नोट लिहिली होती. यामध्ये त्याने अभिनेता साहिल खानचा उल्लेख केला आहे. मनोज पाटील सध्या कूपर रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पाटीलने गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी रात्री मनोज पाटीलने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
मिस्टर इंडिया राहिलेला मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत उतरायचं होतं. यामुळेच साहिल खान आपण स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा मनोज पाटीलचा आरोप आहे. याशिवाय व्यावसायिक तसंच इतर वादही होते. याशिवाय साहिल खान सोशल मीडियावर आपली बदनामी करत होता असंही मनोज पाटीने म्हटलं आहे. या सर्व गोष्टींमुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
दरम्यान मनोज पाटीलच्या कुटुंबाकडून ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आहेत. तसंच दुपारी मनोज पाटीलचं कुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मदतीची मागणी करणार असल्याची माहिती आहे.





















Join Our Whatsapp Group