पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवरील मोशीतील टोलनाका शनिवारपासून बंद झाला आहे. मुदत संपल्याने आयआरबी कंपनीने शुक्रवार रात्री १२ वाजल्यापासून टोलवसुली बंद केली. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, वाहतूक कोंडीतून सुटका झाली.
मोशीतील टोलनाक्यावर जुन्नर खेड, आंबेगाव आदी ग्रामीण भागातून शहराकडे, तर पिंपरी-चिंचवड, पुणे शहराकडून चाकण औद्योगिक परिसराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना टोल भरण्यासाठी थांबावे लागत होते.
औद्योगिक परिसरातील मालाची वाहतूक करणारी जड वाहने या मार्गावरून जात होती. वाहनांची मोठी वर्दळ होती. टोलनाक्यामुळे मोठी वाहतूककोंडी होत होती.
मोशीतील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागत होत्या. त्यामुळे रांगेमध्ये बराच वेळ थांबावे लागत असल्याने वाहनचालकांना वेळेचा आणि इंधनाचा फटका बसत होता. टोलनाक्याची मुदत संपली आहे. त्यामुळे टोलवसुली आजपासून बंद झाली आहे. टोलवसुली बंद झाल्याने वाहतूक कोंडी होत नाही.






















Join Our Whatsapp Group