पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचा वार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३० ऑक्टोबरला सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे १२५० आजीव सभासद असून, संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, सहसचिव, खजिनदार, हिशोब तपासणीस व सभासद या पदांकरिता निवडणूक होईल.
असोसिएशनकडून नवीन सभासद नोंदणी केली असून, १४ ऑक्टोबरला मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. १६ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृती, २१ ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी, २५ ऑक्टोबरला पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
२६ ऑक्टोबरला उमेदवारांचे मनोगत तर ३० ऑक्टोबरला मतदान, मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अॅड. सुभाष चिंचवडे, अॅड. उत्तम चिखले, अॅड. देवराव ढाळे, अॅड. सुशिल मंचरकर, अॅड. विजय शिंदे, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. अनिल तेजवानी, अॅड. विलास कुटे, अॅड. सुहास पडवळ यांची समिती निवडणुकीचे कामकाज पाहणार आहे.






















Join Our Whatsapp Group