पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी युवासेनाच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते. शिबीरचे उद्घाटन मावळ युवासेना विस्तारक राजेश पळसकर ह्यांच्या हस्ते झाले.
ह्यावेळी राजेशजी पळसकर म्हणाले कि ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही शिकवण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी आम्हाला दिली आहे. निलेश हाके ह्यांनी केलेले कार्य समाजउपोयगी आहे. येत्या निवडणूकीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत युवासेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक असतील असे प्रतिपादन पळसकर ह्यांनी केले.
ह्यावेळेस शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दीपक अण्णा काटे, युवासेना चिंचवड युवा अधिकारी माउली जगताप, पिंपरी युवासेना समन्वयक रवी नगरकर, सामाजिक कार्यकर्त्या शिला जाधव, जेष्ठ नागरिक रामभाऊ शिंगोटे, प्राजक्ता कांबळे, महिला विभाग संघटिका कोमल जाधव, किरण पिंपळे, अस्मिता कांबळे, संजय गरुड, रवी कांबळे, प्रभाकर हिंगे, यलप्पा वालदोर, मनोज काची, चिंचप्पा नींडोळ, अथर्व शिंदे, टॉनी मकासरे, अविराज जाधव, स्वप्निल शेवाळे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी केली होते.




















Join Our Whatsapp Group