पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील नगरसेवक राहुल कलाटे मित्र परिवार आयोजित दीपोत्सव विशेष रांगोळी स्पर्धेचे सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत भव्य पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. एकविरा देवीची हुबेहूब छबी साकारणाऱ्या स्नेहा पांडे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेविका अश्विनी वाघमारे, किरण वडगामा, वृषाली कलाटे, सावरी कलाटे, दीपाली कलाटे, लीना कलाटे, रतीशा कलाटे, मनिषा वाडघरे, अनिता वाडघरे, अनुजा कलाटे, मिनी ससाणे, शिवाजी कटके, बाळा कलाटे, मालेश कलाटे, सुधीर देशमुख, सारा बिरारी, मीरा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाळीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. विजेत्या प्रत्येक महिलेस मानाची पैठणी व आकर्षक बक्षिसे तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राहुल कलाटे यांच्या विकासात्मक धोरणांबाबत महिलांनी मनोगतातून भरभरून स्तुती केली. स्नेह भोजनाने सांगता झाली. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे- दिपाली सोनी (द्वितीय), उदय साबडे (तृतीय), प्रेरणा पाटील, रेणुका साधु (उत्तेजनार्थ).