पिंपरी (Pclive7.com):- चिखली-मोई फाटा येथील बसस्थानकाची मोठी दुरावस्था झाली असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या बसस्थानकाची तातडीने दुरूस्ती करून गतीरोधक बसविण्यात याव्यात अशी मागणी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी केली आहे.

याबाबत दिनेश यादव यांनी बी.आर.टी.एस. विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चिखली-मोई फाटा येथे असलेल्या बसस्थानकाची दुरूस्ती करण्याची गरज आहे.
येथील गतीरोधक तातडीने न टाकल्यास अपघाताची शक्यता आहे. तसेच बालघरे वस्ती येथे आत जाताना देखील गतीरोधक टाकुन देण्यात यावे. असे दिनेश यादव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group