तळेगाव (Pclive7.com):- कोंबड्या फुकट दिल्या नाहीत म्हणून कोंबडी व्यवसायिकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून जखमी केले. नवलाख उंबरे, मावळ येथे शुक्रवारी (दि.१८) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी इसमाला अटक केली आहे.

नवनाथ निवृत्ती कदम (वय ३८, रा. नवलाख उंबरे, मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. वैभव दिलीप सावंत (वय २, रा. चांडोली, खेड) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव यांचा कोंबडी विक्रीचा व्यवसाय आहे. अटक आरोपी नवनाथ याने शुक्रवारी वैभव यांच्याकडे खाण्यासाठी फुकट कोंबड्या देण्याची मागणी केली. वैभव यांनी फुकट कोंबड्या देण्यास नकार दिला याचा राग मनात धरून आरोपीने लोखंडी रॉड वैभव यांच्या डोक्यात घालून गंभीर जखमी केले. असे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपी अटक असून, पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहे.






















Join Our Whatsapp Group