पुणे (Pclive7.com):- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्या वतीने देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुंबई येथे २५ एप्रिल रोजी मेळावा घेण्यात येणार आहे.

मंगळवारी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने देशाचे नेते पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी विमुक्त जाती व भटक्या समाजातील अडीअडचणी बाबत चर्चा करून सोडविण्यासाठी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. तसेच राज्यस्तरीय मेळावा २५ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृह येथे घेण्याचे ठरले आहे.
यावेळी सोलापूर शहर कार्याध्यक्ष मोहम्मद इंडीकर, शहर उपाध्यक्ष रेवणनाथ चव्हाण, लोकसभा अध्यक्ष लक्ष्मण भोसले, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष निर्मलाताई माने यांनी देखील कार्य अहवाल सादर केला. राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group