पिंपरी (Pclive7.com):- महावितरणचे पेमेंट अपडेट करायचे आहे, असे भासवून महिलेला दोन अॅप डाऊनलोड करायला सांगून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सांगवी येथे घडला. या प्रकरणी एका ५३ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार ३ जुलै ते ५ जुलै या ते कालावधीत घडला, मोबाईलधारक आरोपीने महिलेला एमएसईबीचे पेमेंट अपडेट करायचे आहे, असे भासवले. महिलेला मोबाईलमध्ये क्विक सपोर्ट अॅप आणि एनी डेस्क अॅप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करायला सांगितले.
त्यानंतर मोबाईलचा स्क्रीन शेअर करून इंटरनेटद्वारे महिलेच्या बँक खात्यावरून १० लाख ३० हजारांची रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्स्फर करून फसवणूक केली. शहर परिसरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्याने परिसरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
सायबर क्राइमच्या घटनेत वाढ झाल्याने परिसरातील नागरिकांमधनू चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणातील मास्टर माइंडला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी होत आहे.