पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी हनुमंत गावडे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावडे यांच्या निवडीनंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हनुमंतभाऊ गावडे हे सध्या पिंपरी चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी नगरसेवक संतोष कोकणे, पै. किशोर नखाते, पै. काळूराम कवितके, वस्ताद अर्जुन काटे, अमित कलाटे उपस्थित होते.