पिंपरी (Pclive7.com):- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मध्यम स्कूल रहाटणी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रणिता जाधव, आरती जाधव, वैष्णवी गवळी, तारा विश्वकर्मा, अर्पिता तिवारी, यशश्री कुटे या विद्यार्थांनी आपल्या मनोगतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव यांनी या महान पुरुषांबद्दल माहिती सांगितली.
सूत्र संचालन तन्मय इंगळे या विद्यार्थ्याने यांनी केले. तर रिया परमार या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृन्द उपस्थित होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमानिमित्त शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.






















Join Our Whatsapp Group