पिंपरी (Pclive7.com):- आज मीतिला सर्व तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी धागे दोरे (फ्रेंडशिप बँड) बांधून फ्रेंडशिप डे साजरा करतात. परंतु दुसऱ्या दिवशी तो धागा कुठेतरी फेकून दिला जातो. परंतु स्टुडन्ट अकॅडमी तर्फे विद्यार्थ्याप्रती वृक्षाबद्दल आत्मीयता असणे व संवेदना जागृत होणे हा दृष्टिकोन ठेवून पिंपरी चिंचवड शहर हरित करण्याचा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी घेतला असून यासाठी भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेचे संस्थापक विजय सोनवले सर यांनी मोलाची साथ देऊन आपण सर्व मिळून पिंपरी चिंचवड शहर हरित व स्वच्छ ठेवू व एक तरी झाड लावून त्याला जोपासून हा संकल्प आज फ्रेंडशिप डे निमित्ताने केला. नेवाळे वस्ती घरकुल परिसरात सर्व जनजागृती करून सर्वांच्या हाती झाडे ठेवून फेरी काढण्यात आली व घोषणा देण्यात आल्या.

ग्लोबल वॉर्मिगमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होत आहे, त्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होताना दिसत असताना काही पर्यावरण प्रेमी आपापल्या पद्धतीने पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असेच स्टुडन्ट अकॅडमीचे संस्थापक विजय सोनवले सर यांनी फ्रेंडशिप डे वृक्षारोपण करून साजरा केला. या बद्दल परिसरातील नागरिकांनी तसेच पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी शहर हरित व स्वच्छ ठेवू असे आवाहन केले आहे. त्याला असाच सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे विजय सोनवले सर यांनी सांगितले आहे. शहर हरित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असा संदेश देखील दिला आहे.






















Join Our Whatsapp Group