पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमधील केशवनगर येथील ओरिएंटल मार्व्हल सोसायटीतर्फे गणेशोत्सव निमित्त रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमास महिला व पुरुषांनी भरगोस प्रतिसाद देऊन 75 बॅगचे रक्त संकलन झाले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 बाटल्यांचे रक्तदानाचे उद्दिष्ट साध्य झाले. यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. मुसर्गी यांच्या सहाय्याने हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. यंदाचे रक्तदान शिबिराचे हे सलग 7 वे वर्षे होते.
यामध्ये सोसायटीचे अध्यक्ष विशाल कुलकर्णी, सचिव साकेत भलगट, खजिनदार संतोष पाटील, सुनिल कांदळकर, अभिजीत बाबर, वरूण कुलकर्णी, सुभाष जोशी, अभिजीत मांगले, हेमंत देशमुख, मनोज सग्रि, शाम कापरे, राजन पाटील, गणेश ओव्हाळ, मारुती पाटील, योगेश लंके श्री. ओव्हाळ व सोसायटी मधील सदस्य तसेच ओम निसर्ग मंडळ यांचे सहकार्य लाभले.




















Join Our Whatsapp Group