पिंपरी (Pclive7.com):- कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या नॅशनल कमिटी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड लिव्हलीहुड २०२२-२३ च्या वरिष्ठ सदस्यांनी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भेट दिली आणि विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात जे उत्कृष्ट काम केले आहे त्याची त्यांनी प्रशंसा केली आहे.
संजय किर्लोस्कर, अध्यक्ष (सीआयआय एनसीएसडीएल), अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, आदित्य घोष, सह-अध्यक्ष, (सीआयआय एनसीएसडीएल) आणि सह-संस्थापक (अकासा एयरलाइनस), सौगता रॉय चौधरी, कार्यकारी संचालक, कौशल्य विकास, अफेरमेटिव्ह ऍक्शन आणि औद्योगिक संबंध, पी पद्मकुमार, सह-अध्यक्ष, (सीआयआय एनसीएसडीएल), अर्चना भास्कर, मुख्य मानव संसाधन अधिकारी, डॉ. रेडीज; राहुल बॅनर्जी, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख कॉर्पोरेट अफेयर्स क्यूस (Quess) कॉर्प लिमिटेड, कॅप्टन अमिताभ, प्रमुख – कौशल्य विकास, टाटा स्टेल लिमिटेड (सीएसआर), संजय मिरचंदानी, डायरेक्टर – एचआर (एसटी) टेलिमिडिया ग्लोबल डेटा सेंटर्स आणि इतर (सीआयआय) सदस्यांनी एसएसपीयु (SSPU) कॅम्पसला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

डॉ. स्वाती मुजुमदार, (प्र- कुलपती सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ) यांनी उपस्थित असलेल्या सदस्यांना एसएसपीयु (SSPU) आणि इंदूर स्थित सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस (SUAS) या दोन्ही कौशल्य विद्यापीठांमधील सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आणि तसेच अधोरेखीत केले की, या कौशल्य विद्यापीठांमध्ये ७० % प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. त्यावेळी त्यांनी सांगितले कि, आमच्या विद्यापीठामध्ये ४००० हुन अधिक विद्यार्थी हे अल्पमुदतीचे कौशल्य अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत आहे. आपल्या भाषणात डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सांगितले की, कौशल्य अभ्यासक्रम घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बरेच प्रयन्त केले पाहिजेत. आणि स्किल इंडस्ट्री मधील अधिकाऱ्यांनी असे सुचविले पाहिजे की, सरकारने कौशल्य अभ्यासक्रम घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि इतर पारंपारिक बारावी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षा देण्याची संधी द्यावी ज्यामुळे त्यांना भविष्यात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल.
अकासा एअरलाइन्सचे सह-संस्थापक आदित्य घोष यांनी सांगितले की, आपल्या एकूण शिक्षण व्यवस्थेत आंतरविद्याशाखीय अभ्यासाचा अभाव आहे आणि उद्योजकतेवर लक्ष केंद्रित केलेले नाही. एसएसपीयूने गेल्या काही वर्षांत अनेक उद्योजक निर्माण केलेले आहेत हे पाहून त्यांना आनंद झाला असे त्यांनी सांगितले.
सिंबायोसिस कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे डॉ. श्रावण कडवेकर यांनी एसएसपीयू आणि विविध उद्योगांच्या मदतीने राबवले जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी सर्व सिम्बायोसिस स्कुलचे प्रमुख उपस्थित होते.
Tags: एसएसपीयु कॅम्पसला भेटकॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कौशल्य विकास समितीची एसएसपीयु कॅम्पसला भेटकौशल्य विकास समिती






















Join Our Whatsapp Group