पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षपदी हेमंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे. या निवडीनंतर पिंपरी चिंचवड शहर विद्यार्थी सेनेला मोठे बळ प्राप्त झाले असून आगामी महापालिका निवडणुकीत याचा मोठा फायदा मनसेला होणार आहे.
हेमंत डांगे हे पिंपरी चिंचवडमधील युवा वर्गाचा चेहरा आहे. शहरात विद्यार्थी सेनेचे मोठे जाळे त्यांनी तयार केले आहे. नुकतेच अमित ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला होता. त्या नियोजनात हेमंत डांगे यांचा मोठा वाटा होता. शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याकरिता हेमंत डांगे यांनी अपार मेहनत घेतली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अमित ठाकरे यांनी हेमंत डांगे यांच्यावर उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
हेमंत डांगे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे यांनी आजवर मांडलेले विचार ध्यानात ठेवूनच आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या पिढीसमोरील विविध शैक्षणिक आव्हानांचा समस्यांचा अभ्यास आणि प्रसंगी आंदोलने करण्यासाठी तुम्ही सदैव सज्ज रहायलाच हवे. मला पूर्ण विश्वास आहे की, ‘महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना’ अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत तुम्हीही झपाटून काम कराल.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील तुमच्या भावी वाटचालीला शुभेच्छा.आपला नम्र,अमित राज ठाकरेअध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना