पिंपरी (Pclive7.com):- महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
नवीन लेखाशीर्ष तयार करणे, विकासकामाचे स्थळबदल करणे, विकासकामाच्या नावात बदल करणे आदी विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

ब प्रभागामध्ये मातीचे ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार असून अनुषंगिक विद्युत व स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. याकामी १ कोटी २१ लाख खर्च होणार आहे. देहू आळंदी रस्त्याच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रोहित्र संच व खांब हलविण्यात येणार आहे. याकामी १ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सन २०२२- २३ करीता पिंपळे गुरवला टाकी व त्यावरील बायपास जलक्षेत्र, एल्प्रो पाण्याची टाकी व त्यावरील बायपास जलक्षेत्र तसेच दत्तनगर जलक्षेत्रातील वितरण व्यवस्थेचे परिचालन करण्यासाठी मजूर पुरविण्याकामी १ कोटी २० लाख रुपये खर्च होणार आहेत.
प्रभाग क्र. ३ येथील विविध ठिकाणी महापालिकेच्या इमारतींची आणि शाळांची सुधारणा करण्यात येणार आहे. याकामी ४८ लाख रुपये खर्च होतील. प्रभाग क्र. ७ मधील भोसरी येथील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी येणाऱ्या ४९ लाख रुपये खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.





















Join Our Whatsapp Group