पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार हत्याराने वार खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या गुन्हेगाराच्या दिशेने गोळीबारही झाला असून घटनास्थळी पुंगळ्या सापडल्या आहेत.

विशाल गायकवाड (वय ३०, रा. मोरेवस्ती, चिखली) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून मोका कारवाईही झाली आहे. दरम्यान, विशाल हा शुक्रवारी (दि.२) सायंकाळी साडे सातच्या सुमारास मोहननगर येथील परशुराम चौकात असताना हल्लेखारांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या दिशेने गोळीबार करीत धारदार हत्याराने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विशाल याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. दरम्यान, विशालच्या दिशेने गोळीबार झाला असला शरीरावर गोळ्या लागल्याचे निशाण नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group