पिंपरी (Pclive7.com):- वाढत्या गोवर आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वतंत्र गोवर कक्ष उभारावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी केली. आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये लहान बालकांमध्ये गोवर या संसर्गजन्य आजाराची लक्षणे वाढत आहेत. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत महापालिकेने लोकवस्तीमध्ये सर्वेक्षणाच्या कामास गती दिली पाहिजे. तसेच यावर लागणाऱ्या औषध साठा, वैद्यकीय साहित्य, शहरातील महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्यात यावे.
तसेच गोवर हा संसर्गजन्य रोगाचा प्रकार असून त्याचा प्रसार वेगाने होत आहे. आपल्या शहरातील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय इतर व रुग्णालयांमध्ये विविध आजारावरती शहरातील व परिसरातील नागरिक उपचार घेत आहे. त्यामुळे सर्व रुग्ण एकाच जागी येत असल्याने गोवर हा संसर्गजन्य रोग असल्याने या बाधित रुग्णाच्या संपर्कात इतर रुग्ण आल्यास या आजाराचा प्रादुर्भाव वाढेल. म्हणून त्यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून पिंपरी चिंचवड शहरात गोवर आयसोलेशन सेंटर उभारण्यात यावे. सर्व तपासण्या या एकाजागी होतील. लसीकरण करून घ्यावे. तसेच इतरांना त्याचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group