चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. पिंपळे निलख येथील माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्यासह काळेवाडी येथील माजी नगरसेविका विजया सुतार यांनी आज (दि.१८) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हे प्रवेश करण्यात आले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पिंपळे निलख येथे जाहिर सभा संपन्न झाली. याप्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. पिंपळे निलख येथील माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कामठे यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी लवकरच पुढील भूमिका स्पष्ट करतील असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कामठे यांच्या प्रवेशामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना मोठा फायदा होणार आहे. पिंपळे निलख या प्रभागातून मोठे मताधिक्य काटे यांना मिळवून देऊ असे आश्वासन कामटे यांनी याप्रसंगी दिले आहे.
यावेळी काळेवाडी येथील माजी नगरसेविका विजया सुतार व त्यांचे पती विजय सुतार यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर बहुजन वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजन नायर, भाजपा विद्यार्थी आघाडीचे प्रसाद कांबळे यांचाही कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे.
Tags: ajit pawarAjit pawar NewsChinchwad By ElectionMahavikas AaghadiNana katencpPimple NilakhTushar Kamthe






















Join Our Whatsapp Group