पिंपरी (Pclive7.com):- अखिल शिवजयंती उत्सव हिंजवडी 2023 अतिशय जल्लोषाने साजरा झाला. सकाळी पहाटे ५ वाजता आगमनासाठी पुण्यातील लाल महाल ते हिंजवडी ह्या मार्गाने शीवज्योत आणण्यात आली. पारंपरिक पद्धतीने ढोल पथक, मर्दानी आखाडा, पालखी सोहळा, वारकरी दिंडी सोहळा व डिजे व डॉल्बी, महाराजांच्या स्मारकाला फुलांची सजावट व विद्युत रोषणईने, दिवसभर पोवाडे साप्ताहिक दर रविवारी नित्य पूजा व दिवा बत्ती केली जाते.
श्री शिवशंभू धारकरी हिंजवडी गेले दोन आडीच वर्ष झाले कार्यक्रम करत आहे. सर्व वर्गणी दार सर्व नेते मंडळी ज्येष्ठ ग्रामस्थ व शिवभक्त ह्यांचा महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान कण्यात आला. समस्त ग्रामस्थ हिंजवडी एक गाव एक शिवजयंती श्री शिवशंभू धारकरी ह्यांनी शिवजन्मोत्सव आनंदात साजरा केला. या सोहळ्यात वाहतुक विभाग व पोलीस आधिकारी यांनी सहकार्य केले.