चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघात आज रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चार तासात २०.६८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान सकाळी ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के मतदान झाले होते.

# सकाळी ०९ वाजेपर्यंत ३.५२ टक्के मतदान
# सकाळी ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के मतदान
# दुपारी ०१ वाजेपर्यंत २०.६८ टक्के मतदान
चिंचवड मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असुन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी ३७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान मतदारसंघातील वयोवृध्द मतदार तसेच दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर विशेष सहायकासह व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. ते देखील मताधिकार बजावत आहेत.






















Join Our Whatsapp Group