चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाचा अवघा एक तास शिल्लक राहिला आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४१.०६ टक्के मतदान झाले आहे. सकाळपासून मतदानाची टक्केवारी कमी होती. मात्र दिवसाअखेरीस मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात आज रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४१.०६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

# सकाळी ०९ वाजेपर्यंत ३.५२ टक्के मतदान
# सकाळी ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के मतदान
# दुपारी ०१ वाजेपर्यंत २०.६८ टक्के मतदान
# दुपारी ०३ वाजेपर्यंत ३३.५५ टक्के मतदान
# सायंकाळी ०५ वाजेपर्यंत ४१.०६ टक्के मतदान
चिंचवड मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असुन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी ३७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group