चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सहावी फेरी संपत आली आहे. सहाव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ३३४१ मतांची आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरी अखेरीस जगताप यांना २१०३७ एवढी मते मिळाली असून महाविकास आघाडीचे नाना काटे पिछाडीवर पडताना दिसत आहेत.
या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्यात टक्कर पहायला मिळत आहे. तर अपक्ष राहुल कलाटे यांच्यामुळे या निवडणुकीत महा विकास आघाडीची मते विभागताना दिसत आहे.
पहिली फेरी
अश्विनी जगताप – ४१६७
नाना काटे – ३६४८
राहुल कलाटे – १६७४
दुसरी फेरी
अश्विनी जगताप – ७९९६ (६४७ आघाडी)
नाना काटे – ७३४९
राहुल कलाटे – ३०४६
तिसरी फेरी
अश्विनी जगताप – ११२२२ (१७८७ आघाडी)
नाना काटे – ९४३५
राहुल कलाटे – ३९४२
चौथी फेरी
अश्विनी जगताप – १३८८० (२४२९ आघाडी)
नाना काटे – ११३५१
राहुल कलाटे – ४५९९
पाचवी फेरी
अश्विनी जगताप – १७०३० (२८२८ आघाडी)
नाना काटे – १४२०२
राहुल कलाटे – ६०६६
सहावी फेरी
अश्विनी जगताप – २१०३७ (३३४१ आघाडी)
नाना काटे – १७८३७
राहुल कलाटे – ८२०७