पिंपरी (Pclive7.com):- भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर अज्ञाताने मेसेज पाठवला आहे. त्यामध्ये लांडगे यांच्याकडे ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केली आहे. मंगळवारी (दि. ४) सायंकाळी अज्ञाताने मेसेज केला. त्यामध्ये ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. परिवर्तन हेल्पलाईनवर काम करणाऱ्या तरुणाने हा मेसेज रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बघितला.

त्यामध्ये ३० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. तसेच खंडणी न दिल्यास मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
(लवकरच सविस्तर बातमी येईल)
























Join Our Whatsapp Group