पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना यमुनानगर शाखा तसेच पुणे जिल्हा संघटिका सौ. सुलभाताई रामभाऊ उबाळे व युवासेना शहर प्रमुख अजिंक्य उबाळे यांच्या वतीने १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू, प्रमाणपत्र व वाचनाची आवड निर्माण करण्यास पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ११६ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी होते. तसेच प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक सुद्धा देण्यात आले. १० वी मध्ये प्रथमेश फुलारी यास ९५.६० टक्के व १२ वी मध्ये समृद्धी काकडे हिस ९३.७० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले.
या कार्यक्रमास शिवसेना भोसरी विधानसभा संघटक अंकुश जगदाळे, युवासेना जिल्हा प्रमुख सचिन सानप, शुभांगीताई बोऱ्हाडे, निर्मला पाटील, कावेरी परदेशी, भारती चकवे, उपविभाग प्रमुख गणेश इंगवले, युवासेना उपजिल्हा प्रमुख अमित शिंदे, शाखा प्रमुख महेश डोके, प्रसिद्धी प्रमुख सार्थक दोशी, किरण वाडकर, संतोष गायकवाड, ढमाले काका, संगीता टूपके, प्रिया जपे, स्मिता मोगरे तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सुलभाताई उबाळे यांनी यावेळी पालकांचे सुध्दा अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.