पिंपरी (Pclive7.com):- रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपरीत झाड रस्त्यावर उन्मळून पडले आहे.पिंपरीतील जयहिंद हायस्कूल जवळ असलेल्या कॉसमॉस बँकेच्या समोरील रस्त्यात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने रस्त्यावर कोणी नव्हते, त्यामुळे हानी टळली.

पिंपरी ते काळेवाडी मार्गावर कॉसमॉस बँकेच्या समोर असलेले हे झाड पहाटेच्या सुमारास उन्मळून पडले. त्यामुळे मोठ्या वाहनांची रहदारी या रस्त्यावरून बंद झाली आहे. सकाळच्या वेळेत कामाला जाणारी वाहने, तसेच स्कूल बस यांचा रस्ता बंद झाला असून येथे वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे.





















Join Our Whatsapp Group