पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने आणि पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ. मेघा पवार यांची रोजगार व स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

या सेलच्या माध्यमातून बेरोजगारी महिला बचतगट, युवक, महिला यांच्यासाठी अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आहे. सेलच्या माध्यमातून गृह उद्योग निर्मिती, व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन, शासकीय योजनां लोकांपर्यंत पोहोचवणे, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे, बाजारपेठेची उपलब्धता तसेच बचत गटाचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर काम करण्यात येणार आहे.

यामुळे आर्थिक सक्षमीकरणाच्या अनेक संधी निर्माण होतील. तसेच पक्षाने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेन, असा विश्वास मेघाताई पवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी केंद्रीय मंत्री मा. सुबोधजी मोहिते (पाटील), दिलीप भाऊ पोटफोडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group