पिंपरी (Pclive7.com):- चांद्रयान – ३ चे यशस्वी लँडिंग झाले आहे. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. कृष्णानगर येथील केंब्रिज चाम्स स्कूलमधील चिमुकल्यांनी देखील या यशस्वी मोहिमेबद्दल आज जल्लोष साजरा केला आहे.

काल सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावरती चंद्रयान ३ यशस्वीरित्या उतरण्यात भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी झाले. देशाच्या विविध संघटनासह चिमुकल्यासह कृष्णानगर केंब्रिज चाम्स स्कूलमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

लहान मुलांनी भारत माता की जय घोषणा देत शाळेचा परिसर दुमदुमून टाकला. तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला. त्यासाठी केंब्रिज स्कूल कृष्णानगर ब्रँचचे संस्थापक कीर्ती मारुती जाधव व सर्व टीचर्स स्टाफ उपस्थित होता.






















Join Our Whatsapp Group